ऐन दिवाळीत
कर्जबाजारी शेतकऱ्याने स्वतःची चिता रचून केले आत्मदहन
नांदेड- कर्ज, सततची नापिकी आणि दुष्काळास कंटाळून उमरी
तालुक्यातील तुराटी या गावातील शेतकऱ्याने स्वतःची चिता रचून स्वतःला पेटवून
घेतल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सांयकाळी घडली. पोतन्ना राजन्ना बलपीलवाड (60) असे मृत शेतकऱ्याचे
नाव आहे.
तेलंगणा राज्याच्या
सीमेवरील तालुक्यातील तुराटी या गावी पोतन्ना रामन्ना बलपीलवाड यांची शेती आहे.
सततच्या दुष्काळामुळे शेतात नापिकी आणि कर्ज यास ते कंटाळले होते. त्यामुळे
शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास त्यांनी स्वतःचे सरण रचून स्वतःस पेटून घेतले. यात ते 100 टक्के
भाजल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
त्यांच्यावर भारतीय
स्टेट बँकेचे २ लाख व जिल्हा सहकारी बँकेचे ४० हजार असे एकूण २ लाख ४० हजारांचे
कर्ज होते. पोतन्ना यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व पाच विवाहित मुली आहेत. या या घटनेने गावात शोककळा
पसरली आहे.
















